माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी कधी एकदा मैदानात उतरून क्रिकेट खेळतोय अशी अशा बाळगून चाहते आहेत. त्यामुळे चाहत्यांची हि आशा पूर्ण होणार आहे. कारण धोनी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे तेहि आयपीएल मधून. त्यामुळे चाहत्यांना आयपीएलची वाट पहावी लागणार आहे.
2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करल्यापासून धोनीने विश्रांती घेतली आहे. त्यावेळेपासून आजतागायत कुठल्याही क्रिकेटच्या प्रकारात त्याने सहभाग घेतला नव्हता. त्यामुळे चाहत्यांना त्याच्या खेळाची प्रतीक्षा लागली होती. मात्र २९ मार्चपासून रंगणाऱ्या ‘आयपीएल’मध्ये धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना आढळणार आहे. एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर धोनीसह चेन्नईचे आणखी काही खेळाडू सरावाला प्रारंभ करणार आहेत.
‘‘आयपीएलच्या तयारीसाठी धोनी सज्ज झाला असून एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर २ मार्चपासून तो सरावाला प्रारंभ करणार आहे. धोनीसह चेन्नईचे अन्य खेळाडूही या सराव शिबिरात सहभागी असतील,’’ असे चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. विश्वनाथन म्हणाले. सुरेश रैना, अंबाती रायुडू हे खेळाडूसुद्धा धोनीसह सरावाला सुरुवात करतील. तसेच चेन्नईच्या सर्व खेळाडूंच्या चमूच्या सराव सत्राला १९ मार्चपासून सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले.