अभिनेत्री भूमि पेडणेकर तिच्या अभिनयामुळे आणि हिट चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र सध्या ती चर्चेत आहे, ते म्हणजे तिच्या हॉट फोटोंसाठी. नुकतेच भूमि पेडणेकरने तिच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन काही हॉट फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे अभिनया बरोबरच तिच्या चाहत्यांना भूमिच्या मादक अदा आणि बोल्ड अवतार या फोटो मधुन पाहायला मिळणार आहे. भूमि ने दम लगा के हइशा या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पदार्पणा पासूनच भूमि पेडणेकरने प्रेक्षकांची मने जिंकली असून नेहमीच या ना त्या कारणांसाठी ती चर्चेत असते.
प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्या दिनदर्शिकासाठी भूमिने पहिल्यांदा टॉपलेस फोटो सेशन केले होते. तिच्या या फोटों मुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हॉट अवतारात भूमि दिसत आहे. तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले असून, यात तीने क्रिम रंगाचा डिप नेक गाऊन घातल्याच पाहायला मिळत आहे.
भूमिच्या या फोटोंना काही तासांतच हाजारो लाईक्स आल्या आहेत. तर तिच्या या बोल्ड अवतारावर चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. तुम्हाला भूमिचा हा हॉट अंदाज कसा वाटला आम्हाला कमेट करुन जरुर सांगा.