सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. नुकतीच भारतीय आयुर्विमा महामंडळाने भरती जाहिर केली आहे. विविध जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख 15 मार्च अशी आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा लाभ करून घ्यावा.
पद आणि जागा
सदरची भरती प्रकिया सहायक अभियंता (AE) आणि सहायक प्रशासाकिय आधिकारी (AAO) पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 218 जागांसाठी भरती प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता आणि परिक्षा
या दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं शिक्षण पदवी पर्यंत असावं ही अट आहे. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मास्टर्सची पदवी असायला हवी.
वयोमर्यादा आणि शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची एक फेब्रुवारी 2020 पर्यंत कमाल 21 वर्ष आणि किमान 30 वर्ष असावं. आरक्षित जागांसाठी ही मर्यादा दहा वर्षांनी वाढणार आहे.प्रत्येक अर्जासाठी 700 रूपये शुल्क असणार आहे. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना यामध्ये सूट असून त्यांना 85 रूपये शुल्क भरावं लागेल.
अधिक माहितीसाठी : पाहा