सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. नुकतीच मिरा-भाईंदर महानगर पालिकेने भरती जाहिर केली आहे. विविध जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2020 असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा लाभ करून घ्यावा.
पद आणि जागा
सदरची महानगर पालिकेची भरती ही पुर्ण वेळ वैद्य़कीय अधिकारी ( FULL TIME MEDICAL OFFICER ) या पदासाठी दोन जागा आणि परिचारीका (STAFF NURSE ) या पदासाठी दोन जागा अशा एकूण 04 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि परिक्षा
या भरतीसाठी वैद्यकीय अधिकारी पदासाठीचा उमेदवार हा MBBS झालेला असावा. तर परिचारीका पदासाठीचा उमेदवार हा 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंगचा कोर्स केलेला आणि मिडवायफरी डिप्लोमा केलेला असावा. या व्यतिरिक्त अनुभव असणाऱ्यांना प्राधाऩ्य दिले जाणार आहे.
वयोमर्यादा आणि शुल्क
वैद्यकीय भरतीसाठी उमेदवाराची 45 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. तर परिचारीका पदासाठी 38 वर्षाची वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवाऱ्यांसाठी 100 रूपये तर मागास वर्गींयासाठी आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही. यासाठी 28 फेब्रुवारीला थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी- पाहा