जर तुम्ही Apple, Samsung, OnePlus, Realme, Xiaomi या सारख्या ब्रँड्सचे स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आताच खरेदी करा. कारण या सर्व मोबाईलवर ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.
अॅमेझॉनवर आज २६ फेब्रुवारीपासून फॅब फोन्स फेस्ट सुरू करण्यात आला आहे. हा सेल २९ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये Apple, Samsung, OnePlus, Realme, Xiaomi या सारख्या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. त्यामुळे या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.
- वनप्लसच्या 7 प्रो या स्मार्टफोनची किंमत 52 हजार 999 रुपये आहे, मात्र या सेलच्या ऑफरमध्ये हा फोन 42 हजार 999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.त्यामुळे तब्बल या फोनवर 10 हजार रुपये डिस्काउंट दिली जात आहे. तसेच एक्सचेंज ऑफरचा पर्याय आहे. या एक्सचेंज ऑफर अंतर्गत 3 हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे.
- गॅलेक्सी M30s हा स्मार्टफोन 15 हजार 500 रुपयांची किंमत असलेला या सेलमध्ये केवळ 12 हजार 999 रुपयांना खरेदी केला जावू शकतो. म्हणजेचे जवळपास 2 हजार 500 रुपयांची सुट देण्यात आली. या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
- विवो व्ही १७ प्रो या फोनवर ५ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे.
- रियलमी ५ प्रो हा फोन या सेलमध्ये ११ हजार ९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.
- Xiaomi Mi A3 हा फोन या सेलमध्ये केवळ ११ हजार ९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.
- शाओमी रेडमी नोट 8 प्रो केवळ 13 हजार 999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. रेडमी नोट 8 हा फोन 12 हजार 999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.