बीड जिल्ह्यात लहानापासून वयाच्या 26 वर्षापर्यत महिला म्हणून वावरलेल्या पोलीस शिपाई ललिता साळवे हिने लिंग बदलून शस्त्रक्रिया मंध्यतरी केली होती. अशाप्रकारे शस्त्रक्रिया झालेलं हे पहिलेच प्रकरण असल्याने हे प्रकरण गाजले होते. दरम्यान ललिता वरुन ललित झालेल्या या व्यक्तीने आता महिलेबरोबर विवाह झाला आहे. या विवाहाची हि राज्यभर चर्चा रंगली होती.
ललितने औरंगाबाद येथील उच्चशिक्षित तरुणीसोबत साध्या पद्धतीने साखरपुड्यात लग्न केले. राजेगाव (ता. माजलगाव) येथे लग्नानिमित्त रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्त्रीचा पुरुष होऊन लग्न केल्यानंतर या रिसेप्शनला वेगळे महत्त्व प्राप्त झाल्याने पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यासह सामाजिक, राजकीय, विधी, डॉक्टर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.यात ललितावर लिंगबदल शस्त्रक्रिया करून तिच्या आयुष्याला नवीन वळण देणारे डॉ. रजत कपूरही उपस्थित होते. ग्रामस्थांनी त्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून सत्कारही केला.
माजलगाव शहर ठाण्यात महिला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या ललिता साळवे यांना वयाच्या 25 वर्षानंतर स्वतःतील शारीरिक बदल जाणवू लागले. आपण स्त्री नसून पुरुष असल्याची जाणीव ललिताला झाल्यानंतर स्त्रीचे आयुष्य न जगण्याचा निर्णय तीने घेतला.यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी पहिले पाऊल टाकले. परंतु महिला म्हणून पोलीस प्रशासनात भरती झालेल्या ललिताला पुरुष झाल्यानंतर नोकरी कायम ठेवण्याचे आवाहन होते.न्यायालयासह शासन स्तरावरील कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर दोन वर्षापूर्वी ललितावर मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉ. रजत कपूर यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली. ‘ती’चा ‘तो’ होत पुरुष म्हणून ललित पुन्हा नोकरीवर रुजू झाला.
‘ललितमुळे राजेगावला नवीन ओळख’ :
लिंगबदल शस्त्रक्रियेसारखा धाडशी निर्णय घेणाऱ्या ललितचा ग्रामस्थांना अभिमान आहे. त्याने दाखवलेला आत्मविश्वास, हिंमत यामुळे देशपातळीवर राजेगावला एक नवीन ओळख मिळाली असल्याची प्रतिक्रिया सरपंच रूपाली कचरे यांनी व्यक्त केली.