वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीला पाकिस्तानचे नागरिकत्व मिळाले आहे. यासाठी त्याने काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता.
काय आहे प्रकरण? :
- सॅमी सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जाल्मी संघाचा कर्णधार असून आयपीएलमध्ये सॅमी सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळतो.
- पाकमध्ये पुन्हा एकदा क्रिकेट सुरू करण्यात सॅमीचे मोठे योगदान आहे. पीएसएलच्या दुस-या हंगामात त्याने पेशावर संघाचे नेतृत्व केले आणि विजेतेपद मिळवून दिले.
- दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सॅमीला पाकिस्तानचे नागरिकत्व दिले गेल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले.
दरम्यान, पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारल्यामुळे सॅमीला आता भारतात आयपीएल खेळता येणार कि नाही याविषयी अजून खुलासा झाला नाही.