Ads
मनोरंजन

डॅनीविषयी जाणून घ्या खास गोष्टी

डेस्क desk team

‘अग्निपथ’, ‘हम’, ‘अंदर बाहर’, ‘चुनौती’, ‘क्रांतीवीर’, ‘अंधा कानून’, ‘घातक’ आणि ‘इंडियन या गाजलेल्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका गाजवलेल्या डॅनी डँग्झोपां यांचा आज 72 वा वाढदिवस. यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याविषयी काही खास गोष्टी.

डॅनीचा जन्म सिक्कीममध्ये झाला. त्यांचं खरं नाव Thsering Phintso Denzongpa आहे.डॅनीला बालपणापासूनच घोड्यांची आवड होती. त्यांना सैन्यदलाप्रती कमालीचं आकर्षण वाटू लागलं.

मात्र भारत- चीन युद्धाच्या भयानक वातावरणामुळे आईने त्यांना सैन्यात भरती होऊ दिलं नाही.पुढे अभिनयाच्या शिक्षणासाठी डॅनी पुण्याच्या एफटीआयआय या संस्थेत दाखल झाले.त्यांच्या नावामुळे एफटीआयआयमध्ये त्याला अनेक वर्गमित्र चिडवत असत. याच डॅनीला वाईट वाटे.यामुळे त्यांची वर्गमैत्रीण म्हणजेच जया भादुरी (जया बच्चन) यांनी त्यांना डॅनी हे नाव दिलं, पुढे ते प्रचलित झालं.

डॅनींची हिंदीवर जास्त पकड नव्हती मात्र त्यांनी अविरत संघर्ष करून हिंदी शिकली.अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त ते गायन, चित्रकला यांसारख्या कलांमध्येही पारंगत आहेत.डॅनी पर्यावरणस्नेही उपक्रमांमध्येही कायमच हिरीरिने सहभागी होत असतात.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: