डोंगर, जंगलात, बंकरमध्ये लपलेल्या शत्रूचा अचूक शोध घेण्यासाठी आयआयटी कानपूर व भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड यांच्या सहयोगातून एक छोटेसे ड्रोन तयार केले आहे.
आर्टिफीशीयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित ड्रोनचा नाव कॉक्रोच अर्थात झुरळ ड्रोन असे असून त्याला इंसेक्ट कॉप्टर असे म्हणतात. त्याद्वारे शत्रूला फसवून हे शत्रूवर नजर ठेवता येते.
ड्रोन भारत इलेक्ट्रोनिक्सकडे टेस्टिंगसाठी सोपवून जूनपर्यंत त्याच्या चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर ते सेना, निमलष्करी दले, अंतरिक सीमा सुरक्षा या विभागाला दिले जाईल.
ड्रोनची वैशिष्ट्ये :
- ड्रोन रेल्वेट्रॅक, वीज तारा, रेस्क्यू ऑपरेशन, पूर, आग निरीक्षणासाठीही फायदेशीर आहे.
- पूर्वी ड्रोनचे वजन 40 ग्रॅम होते, आता ते 22 ग्रॅमवर आले असून ते तळहातावर सहज मावते.
- हे ड्रोन भिंतीला एखाद्या किड्याप्रमाणे दीर्घकाळ चिकटून राहू शकते, शिवाय दोन तासापर्यंत व्हीडोओ घेऊ शकते.
हे ड्रोन भिंतीवर चिकटते त्यावेळी त्याची मोटर बंद होते, त्यामुळे बॅटरी बॅकअप वाढतो. ड्रोनला किड्यासारखे 8 पाय असून त्यामुळे त्याची पकड मजबूत आहे. ते रात्रीही काम करू शकते.