मीरा भाईंदरमध्ये महापौर निवडणुकीने राजकारण तापले असतानाचा मोठा राजकीय भूकंप झाला. शहरातील भाजपचे सर्वांत निष्ठावंत नेते असलेल्या नरेंद्र मेहता यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यामुळे या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.
राजीनाम्या संदर्भात बोलताना नरेंद्र मेहता यांनी सांगितले कि, ११ वर्षापासून भाजप मध्ये काम केले आहे. या राजकीय कार्यकाळात अनेक उतार चढाव येत गेले. या दरम्यान नगरसेवक, कार्यकर्ता व जनतेने चांगली साथ लाभली. मात्र माझ्या वर्तवणुकीमुळे पार्टीला नुकसान होत होते. माझ्यामुळे माझ्या नेत्यांना झुकावे लागेल. अशी गोष्ट मी कधीच मान्य करू शकत नाही, यामुळे मी माझ्या भारतीय जनता पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी सांगितले.
दरम्यान मी यापुढे कुठल्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नाही आणि राजकारण हि करणार नसल्याचे मेहता यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीत गीता जैन यांनी नरेंद्र मेहता यांना पराभूत केले होते.