नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. नुकतेच स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतासाठी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा लाभ करून घ्यावा.
पद आणि जागा
सदर भरतीसाठी लॅब असिस्टंट, टेक्निकल ऑपरेटर, स्टोअर कीपर, ज्युनिअर इंजिनिअर, सायंटिफिक असिस्टंट, फिल्ड असिस्टंट, टेक्निकल ऑफिसर, आहारतज्ञ ग्रेड III, टेक्निकल सुपरिंटेंडेंट अशा अनेक पदांसाठी एकूण 1355 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि परिक्षा
या भरतीसाठी 10 वी, 12वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी किंवा समतुल्य गरजेचे आहे. तसेच संबंधीत भरतीसाठी 10 ते 12 जून 2020 दरम्यान परिक्षा असणार आहे.
वयोमर्यादा आणि शुल्क
भरतीसाठी उमेदवार 18 ते 25/27/30 वर्षांपर्यंत वयोमर्यादा ठरविण्यात आला आहे. तर SC/ST साठी 5 वर्षांची तर OBC साठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवाऱ्यांसाठी 100 रूपये तर मागासवर्गींयासाठी आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अधिक माहितीसाठी- पाहा