सध्या चीनमध्ये कोरोना नामक व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. या व्हायरसने आतापर्यंत असंख्य लोकांचा जीव घेतला आहे. अशात कोरोनाच्या भितीने फिलिपिन्स देशातील एका विवाह सोहळ्यात नववधु आणि वर यांनी चक्क मास्क घालुन चुंबन करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरत आहे. आशियाई देश यात आघाडीवर असून, एकट्या चीनमध्ये कोरोनाने 2236 लोकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे फिलिपिन्सच्या बोकाल्डो शहरात शासनमान्य एका सामुहिक विवाह सोहळ्यात कोरोनाच्या धास्तीने वधु आणि वर यांनी मास्क घालत विवाह केला.विवाहा नंतर त्यांनी मास्कवरच एकमेकांना किस केले आहे. या सबंधित व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
220 जोडप्यांचा मास्क घालुन विवाह
दरम्यान, या सामुहिक विवाह सोहळ्यात 220 जोडपी मास्क घालुन विवाह बद्ध झाली आहेत. व्हेलनटायीन नंतर फिलिपिन्समध्ये अशा प्रकारच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा या विवाह सोहळ्यावर कोरोनाच सावट पाहायला मिळाल. नेग्रोस बेटाच्या बाकोलॉड शहरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या या सोहळ्याला वधु- वरांच्या आई वडिलांसह जवळपास 30 हजार जणांनी उपस्थिती लावली असल्याचा आंदाज आहे.
Love in the Time of Corona(virus)#masswedding #maskedkissing #coronavirus #Philippines pic.twitter.com/X0tjwstNUn
— Meraj Hasan (@jimmyjaazz) February 23, 2020
वर- वधुची कोरोना चाचणी
दरम्यान, या विवाह सोहळ्यासाठी उपस्थिती लावलेल्या वर- वधुसह प्रत्येकाला मास्क आणि सॅनिटायजरचा पुरवठा करण्यात आला. तसेच विवाहा पुर्वी प्रत्येक वर आणि वधुची कोरोनो व्हायरसची चाचणी करण्यात आली. आतापर्तंय जपानच्या डायमंड क्रुझवरील 7700 प्रवाशांपैकी 636 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असून, त्यात 44 फिलिपिन्स नागरिकांचा समावेश आहे. कोरोना मुळे फिलिपिन्स सरकारने नागरिकांना चीन, हाँगकाँग आणि मकाऊ येथे जाण्यास बंदी घातली आहे.