फेब्रुवारी महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असल्याने हे लिप इयर आहे. त्यामुळे लिप इयर फेब्रुवारीचा हा शेवटचा आठवडा नोकरदार, व्यावसायिक, गृहीणी, विद्यार्थी, कलाकारा तसेच राजकारणासह सगळ्याच क्षेत्रातील मंडळींना कशाप्रकारचा असेल ते जाणून घेऊयात.
मेष :
नोकरदार वर्गासाठी हा आठवडा काहीसा दिलासा दायक ठरणार आहे. मात्र व्यावसायिक मंडळींना हा आठवडा काहीसा अधिक धावपळीचा आणि खर्चिक ठरणार आहे. प्रवासाचे योग येतील त्यामुळे प्रकृतीच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे. नव्याने व्यवयसायात पडलेल्यांसाठी चांगला काळ आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. सामाजिक क्षेत्रातील मंडळींना तसेच कलाकारांसाठी हा आठवडा उत्साह वाढवणारा असणार आहे. जोडीदार, सहकारी, मित्र यांच्या मदतीची चांगली साथ लाभेल.
वृषभ :
हा संपुर्ण आठवडा वृशभ राशीच्या मंडळींसाठी उत्साह पुर्ण कामाचा आठवडा असणार आहे. अनेक नियोजीत कामे पुर्ण होतील. प्रकृतीची उत्तम साथ लाभेल. मात्र थोडा धावपळीचा आठवडा असल्य़ाने खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या. आठवड्याच्या अखेरीस शक्यतो तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. आठवडाभराच्या कामाने बाहेर जाणे टाऴुन आरामासाठी वेळ द्या. संपूर्ण आठवडा सामान्य अभ्यासासाठी चांगला असला तरी शेवटच्या दोन दिवसात अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. सध्या परीक्षेच्या अभ्यासासाठी आळस दूर सारावा लागेल.
मिथुन :
व्यावसायिक मंडळींसाठी हा आठवडा अधिक लाभदायी ठरणार आहे. नवीन व्यवहार तसेच खरेदी विक्रिसाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी चांगला काळ आहे. सुरवातीपासूनच अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. आर्थिक बाजु भक्कम राहणार असल्याने, तसेच अनेक काम मार्गी लागणार असल्याने तुम्ही आनंदी आसाल. विवाहित मंडळींनी कुटूंब आणि पत्नी दोघांसाठी वेळेच नियोजन करा. तुम्हाला प्रगतीत जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
कर्क :
या आठवड्यात व्यावसायिक मंडळींनी गुंतवणुक करताना पुर्ण विचारा अंती निर्णय घ्यावा. वरिष्ठांशी तसेच जेष्ठांशी सल्ला मसल्लत करावी. नोकरदार मंडळींनी सहकाऱ्यांशी जुळवुन घ्याव. वाद होणार नाही य़ाची काळजी घ्यावी, त्यासाठी वाणी वर नियंत्रण ठेवा. घरातील वादात तुमच्या मध्यस्थीने वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. तेंव्हा वादा पासून थोडे दुरच राहा. न्यायालयीन प्रकियेत असलेल्यांच्या कामात काहीसा वेग येऊल. जोडीदाराशी वाद न घालता समजुतीची भावना दाखवा.
सिंह :
कलाकार तसेच सामाजिक क्षेत्रातील मंडळींना हा आठवडा नाव लौकिक आणि प्रसिद्धी मिळवुन देणारा ठरणार आहे. विवाह इच्छुक मंडळींना हा चांगला काळ आहे, जोडीदार शोध पुर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायिक मंडळींसाठी आठवड्याची सुरवात काहीशी मंद असेल. मात्र आठवड्याचा शेवट आर्थिक दृष्ट्या चांगला असेल. प्रवासाचा योग येण्याची शक्यता आहे. प्रकृतीची थोडी अधिक काळजी घ्या.
कन्या :
आर्थिक व व्यावसायिक दृष्टीने दीर्घकालीन आर्थिक नियोजन पूर्ण होईल, परंतु काही वैद्यकीय, धार्मिक किंवा व्यवहारिक खर्चाची तयारी ठेवावी लागेल. मागील सप्ताहाच्या तुलनेत हा आठवडा चांगला राहिल. निर्णय घेताना सल्लामसल्लत करा. मात्र धुर्त लोकांपासून सावध राहा, त्यासाठी कोणावरही विश्वास ठेवणे टाळा. आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
तुळ:
व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी व्हाल, मात्र एखादी नवीन सुरवात करताना किंवा नवीन धाडस करताना इतरांवर अवलंबून राहू नये. आठवड्याभरात ग्रहमानाची उत्तम साथ लाभल्याने चांगल्या बातमीची अपेक्षा ठेवण्यात हरकत नाही. एखादी नवीन सुरवात करताना किंवा नवीन धाडस करताना इतरांवर अवलंबून राहू नये. प्रवासा बरोबरच काही जुन्या आप्तेश्ष्ट मंडळींच्या भेटीची शक्यता आहेत.
वृश्चिक :
व्यवसायिक मंडळी, नोकरदार वर्ग तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना हा आठवडा फायदेशीर ठरणार आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल व महत्वाचा आहे. त्यांना काही बाबतीत थोडा दिलासा सुद्धा मिळेल. मात्र शैक्षणिक क्षेत्रातील निर्णय घेताना कोणत्याही प्रकारे घाई करु नका.
धनु :
रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवल्यास तुमच्या कामाला गती मिळेल. नाहीतर वादातून गोष्टी बिघडण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल. विवाहासाठी जोडीदाराच्या शोधात असेलेल्यांचा शोध या आठवड्यात पुर्ण होईल. नोकरी – व्यवसायात सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आपल्या उत्तम कामगिरीने वरिष्ठ खुश होतील. कौटुंबिक वातावरण सुद्धा आनंदी राहील.
मकर :
व्यवसायात नवीन व्यक्तींशी संबंध तसेच गाठी भेटी होतील. मात्र आर्थिक गुंतवणुक तसेच कोणताही करार करताना सल्ला मसल्लत जरुर करा. नोकरी तसेच व्यवसायिक क्षेत्रात अनपेक्षित लाभ तसेच कामात बढती मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल व महत्वाचा आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार असल्याने प्रथमपासून अनावश्यक खर्च करण्यास प्रतिबंध करा. आपल्या वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रकृतीच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहिल.
कुंभ :
ग्रहांची स्थिती चांगली असल्याने सुरवाती पासून शेवट पर्यंत हा आठवडा पुर्णपणे चांगला जाणार आहे. व्यवसायिक तसेच नोकरदार मंडळींना हा आठवडा सामान्य राहिल. मात्र कलाकार, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मंडळींना हा आठवडा विशेष संधी मिळवुन देणारा ठरणार आहे. आठवड्याच्या मध्यास प्राप्तीत वाढ होत असल्याचे आपणास दिसून येईल. विद्यार्थ्यासाठी मात्र अभ्यासाचा थोडा कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे लागेल. अभ्यासात आपली एकाग्रता होत नसल्याचे जाणवेल.
मिन :
मिन राशीच्या मंडळींसाठी हा आठवडा सामान्य राहिल. आहे तीच कामे पुर्ण करण्याचे उद्दीष्ठ ठेवा. नवीन काम करण्याचा कार्यक्रम शक्यतो पुढे ढकला. प्रकृतीच्या थोड्या फार समस्या जाणवतील. मानसिक शांततेसाठी मन एकाग्रता तसेच शांततेसाठी योगा करा. तुमच्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. वैवाहिक मंडळींसाठी हा आठवडा प्रणय जीवन खुलवणारा असणार आहे. या आठवड्यात प्रत्येक कामात तुम्हाला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे.