मागील अनेक दिवसांपासून सर्वत्र रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची जबरदस्त चर्चा रंगत आहे. सगळेच या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणून न धरता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या संबंधित अभिनेता अक्षय कुमार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या तारखेला होणार प्रदर्शित
अक्षय कुमारने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना, ‘आता गुन्हा होणार नाही कारण पोलीस येत आहेत’, असे कॅपश्न दिले आहे. येत्या 2 मार्च 2020 ‘सुर्यवंशी’चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. तर 24 मार्चला सर्व चित्रपटगृहात चित्रपट पाहायला मिळणार आहे.
Ain’t no time for crime ‘coz Aa Rahi Hai Police!🚨🚔👊🏻#Sooryavanshi releasing worldwide on 24th March.#SooryavanshiOn24thMarch@ajaydevgn @RanveerOfficial #KatrinaKaif #RohitShetty @karanjohar @RelianceEnt @RSPicturez @DharmaMovies #CapeofGoodFilms @PicturesPVR @TSeries pic.twitter.com/OJx1ytnOLM
— Akshay Kumar (@akshaykumar) February 24, 2020
हे असतील कलाकार
या चित्रपटाच्या माध्यामातून अक्षय कुमार आणि कतरिना कैफ ही जोडी खूप काळानंतर स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच अजय देवगण, रणवीर सिंगला ही चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या आधी अजयने रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’, ‘सिंघम रिट्न्स’या चित्रपटामध्ये दिसला आणि रणवीर 2018 मध्ये चांगलाच धुमाकुळ घेतलेला ‘सिम्बा’ हा चित्रपट केला आहे. तर आता ‘सुर्यवंशी’ या चित्रपटातून बॉलिवूडचे तीन सुपरस्टार्सना एकत्र पाहायला मिळणार आहे. तसेच लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.