मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याचे म्हंटले होते.आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर राज्य सरकारकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. pic.twitter.com/mhonnTa8Ox
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 24, 2020
ही यादी जाहीर करताना सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश केलेला असून, पहिल्या यादीत 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थ्यांची नावे आहेत.राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची अमलबजावणी करण्यापूर्वी 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती संग्रहित केली होती. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
जिल्हा पातळीवर कर्जमाफीच्या अमलबजावणीचे काम सुरू झाले आहे. सरकारने कर्जमाफीसाठी पुरवणी मागणी सभागृहात पटलावर ठेवली आहे. यावर 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी चर्चा होणार आहे.