‘Netflix’ या व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिसने भारताला मोठा दणका दिला आहे. सदर कंपनीकडून ग्राहकांना दिली जाणारी एक महिना फ्री ट्रायल सेवा बंद करण्यात आलीय. पण हि सेवा बंद केली असली तरी एक नवी सेवा ‘Netflix’ ने ग्राहकांसाठी आणली आहे.
दरम्यान, या नवीन सेवेमध्ये ‘Netflix’चा वापर करणाऱ्या ग्राहकांना पहिल्या महिन्यात पाच रूपये द्यावे लागणार आहेत. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार; ही नवी सेवा फक्त नव्या ग्राहकांसाठी असून जुन्या ग्राहकांना याचा लाभ घेता येणार नाही. ही ऑफर कंपनीने 21 फेब्रुवारीपासून चालू केली असली तरी सध्या त्याची चाचणी सुरू आहे. व चाचणी पूर्ण झाल्यावर सर्वा नव्या ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.
‘नेटफ्लिक्स’ने हे पाऊल मार्केटिंगच्या दृष्टीकोनातून उचलण्यात आलेला आहेय. ‘नेटफ्लिक्स’मध्ये ग्राहकांना अनेक लोकप्रिय वेब सिरीज, टीव्ही शो, चित्रपट पाहायला मिळतात. त्यामुळे भारतीय नागरिकांची याला चांगलीच पसंती मिळत आहे.