अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. एकेकाळी पंतप्रधान मोदींना विझा नाकारणाऱ्या अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आले असून, त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी, मुलगी आणि जावाई देखील भारतात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:हा विमानतळावर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते. विमानतळावर मोदी आणि ट्रम्प यांनी गळा भेट घेतली. विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत खास भारतीय शैलीत ट्रम्प यांचे स्वागत करण्यात आले. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या खास सुरक्षेन परिपुर्ण असलेल्या विमानाने ट्रम्प भारतात दाखल झाले.
या ठिकाणांना दिली भेट
अमेरिकेत मोदींसाठी हाऊडी मोदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांच्या साठी नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी विमानतळावरुन थेट महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमला भेट देली. त्यानंतर अहमदाबाद येथील जगातील सगळ्यात मोठ्या मोटेरा क्रिकेट स्टेडिमचे उद्घाटन ट्रम्प यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. एक लाखाहुन अधिक लोक बसु शकतील इतकी आसन व्यवस्था या स्टेडियमची असून, ट्रम्प यांच्या स्वागतासाठी लाखोच्या संख्येने लोक दाखल झाले आहेत. यावेळी स्टेडियमवर अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. दरम्यान भारत दौऱ्यावर येणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत.
Gujarat: Prime Minister Narendra Modi and US President Donald Trump hug each other after the PM concluded his address at #NamasteTrump event, at Motera Stadium in Ahmedabad. pic.twitter.com/p42WSqxXAX
— ANI (@ANI) February 24, 2020
मोदींचे मानले आभार
डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाच्या व्हिजिटर्स बुकमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली असून, यावेळी प्रतिक्रिया लिहिताना, या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्यांनी आभार मानले आहेत. तसेच यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांनी स्वतहा चरखा देखील चालवला. दरम्यान, ट्रम्प यांनी नमस्ते म्हणत मोदी हे माझे खरे मित्र आहेत, भारतानं दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. अस म्हणत पंतप्रधान मोदी आणि भारतीयांचे ट्रम्प यांनी आभार मानले.
US President Donald Trump: 5 months ago the United States welcomed your great Prime Minister at a giant football stadium in Texas and today India welcomes us at the world's largest cricket stadium right here in Ahmedabad. #NamasteTrump pic.twitter.com/gsreWbLqWm
— ANI (@ANI) February 24, 2020