निवडणूक म्हटलं तर सत्तेसाठीच रस्सीखेच, शाब्दिक खंडागजी, बहुमत सिद्ध करण्यासाठी धडपड होत असते मात्र येथे अशाप्रकारच कुठलही कारस्थान न करता बिनविरोधी कुत्राच महापौरपदी निवडून आला आहे. विशेष म्हणजे त्याचा शपथविधी सोहळा ही दिमाखात पार पडला. यावेळी राजकीय नेत्यांनी त्याच्याबरोबर फोटोसेशन ही केले आहे.
महापौर पदाच्या सर्वस्वी निवडणुकीत महिला अथवा पुरुष निवडून येत असतात, मात्र अमेरिकेच्या कोलोराडो राज्यातील जॉर्जटाउन शहरात चक्क एक (पार्कर नावाचा) कुत्रा महापौरपदी बहुमताने निवडून आला आहे. विशेष म्हणजे या निवडीसाठी कोणताही प्रतीस्पर्धी अथवा कोणत्याही प्रकारचा आरोप प्रत्यारोप झाले नव्हते. याउलट सर्वांनी बहुमत देत उमेदवाराला महापौर पदी नेमून दिल्याचे समजत आहे.
जॉर्जटाउन शहराच्या महापौरपदी या कुत्र्याची निवड झाल्यानंतर कम्युनिटी सेंटरमध्ये त्याचा शानदार शपथविधी सोहळा पार पडला.या शपथविधी महापौरपदाची शपथ पदभार सांभाळण्यासाठी पार्कर टाय, कॅप, चष्मा अशा वेशभूषेत आला होता. या खास शपथविधी सोहळ्याचे फोटो क्लिअर क्रिक कौंटीच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आले. आणि अर्थात हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झालेत. तसेच स्थानिकांसह अनेक श्वान प्रेमी नागरिकांनी हजेरी लावली होती.
पार्कर हा एक सेलिब्रेटी श्वान आहे. इन्स्टाग्रामवरही त्याचे अकाउंट असून त्याचे 16 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. पार्कर हा लवलँड स्की परिसराचा मॉस्कट आहे. त्याशिवाय त्याने रॉकी माउंटनमधील एका गावातील थेरेपी कॅम्पमध्येही सहभागी घेतला होता, आणि आता यापुढे तो जॉर्जटाउनचा महापौर म्हणून काम पाहणार आहे.