Ads
बातम्या

 प्रेक्षकांना घाबरवण्यात अपयशी ठरलेला भूत

Bhoot movie review
डेस्क बातमीदार

भूत भाग एक : द हाँटेड शिप हा अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. भूत म्हणजे भिती, डरावने आवाज, जबरदस्त साऊंड इफिक्ट, हृदयाचा ठोका चुकवणारी दृश्य अशा पद्धतीची चित्रपटाची मांडणी असणे हे अशा चित्रपटांच्या यशाच गणित असत. चित्रपट बघतांना थरारक दृश्यांनी प्रेंक्षक घाबरला पाहिजे मात्र प्रेक्षकांना घाबरवण्यात हा चित्रपट समशेल अपयशी ठरलेला आहे. चित्रपट पाहतांना भिती पोटी प्रेक्षकगृहात तीन तास बसवण्यात लेखक आणि दिग्दर्शक भानू प्रताप सिंह हे अपयशी ठरले आहेत.

फसलेल्या भूतची कथा

अभिनेता ‘विकी कौशल’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याने हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र ‘राझी’ आणि ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटातून एक मिशन हाताळत कथानक पुढे नेणाऱ्या विकी कौशलने मात्र भूत चित्रपटात प्रेक्षकांची निराशा केली आहे. पृथ्वी या शिप ऑफिसरची भूमिका साकारत असलेल्या नायकावर म्हणजेच विकी कौशलवर जुहू बिचवर अडकलेल्या एका जहाजाच्या परिक्षणाच कार्य दिल जात. या आधी एका घटनेत पृथ्वीच्या पत्नीचा म्हणजेच ‘भूमी पेडणेकर’ आणि मुलाचा मृत्यू झालेला असतो. तर जहाजावरील सगळ्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली असते. त्यांच्या आत्महत्येच गुढ आणि आपल्याच चुकीने पत्नी आणि मुलाला गमावलेल्या पृथ्वीला बायको आणि मुलांचा भास होत असतो, असे या चित्रपटाचे कथानक आहे.

दिग्दर्शन अभिनयात ही अपयशी

या चित्रपटातील पृथ्वीची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलला पाहताना तितकीशी मजा येत नाही. चित्रपटात दाखवण्यात आलेले घाबरवणारे प्रसंग तितकेसे इफेक्टीव वाटत नाहीत. अनेक रहस्य दाखवताना चित्रपटाच्या कथानकातील रहस्यमय भूताटकी उलगडणारा जोशी म्हणजेच आशुतोष राणाने साकारलेला संशोधक देखील फारशी कमाल करु शकलेला नाही. आपल्या हटके अभिनय आणि भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला आशुतोष राणा देखील चित्रपटात फारस प्रभावी काही करु शकलेला नाही. चित्रपटाची सिनेमेटोग्राफी उत्तम आहे. ते सोडल्यास भूत हा एक फसलेला हॉरर मुव्ही आहे असेच म्हणावे लागेल.

चित्रपटाला स्टार
2

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: