Ads
मनोरंजन

Video; पाकमधील लग्न सोहळ्याला शत्रुघ्न सिन्हांची हजेरी

shatrughan-sinha
डेस्क desk team

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता आणि काँग्रेस पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा सध्या सोशल मीडियावर आणि चित्रपटसृष्टीत सक्रिय नसले तर सध्या एक व्हायरल व्हिडिओमुळे ते चर्चेत आले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी सोशल मीडियावर संपात व्यक्त करत आहेत.

काय आहे व्हिडिओत? 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत शत्रुघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील एका लग्न समारंभाला हजेरी लावली आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी फोटोग्राफर ओसमान परवेज मुगलने शेअऱ केला आहे. तर व्हिडिओ शेअर करत त्यांनी ‘रीमा आणि शत्रू जी यांनी हेमा आणि अहमद यांच्या कव्वाली नाइटला हजेरी लावली’ असे कॅप्शन दिले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव आणि दरदिवशी पाककडून सिमा भागांवर होणारे शस्त्र संधीचे उल्लंघन सुरू आहेत. अशा परिस्थितीत शत्रुघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानमधील लग्न सोहळ्याला लावलेल्या हजेरीमुळे सोशल मीडियावर मोठ्या मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: