Ads
बातम्या

समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारा ‘शुभमंगल ज्यादा सावधान’

shubha mangal zyada saavdhan
डेस्क desk team

पदार्पणातच ‘विकी डोनर’ सारखा वेगळ्या आणि चौकटी बाहेरच्या विषयाच्य़ा चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधणाऱ्या आयुष्मान खुरानाने समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारा शुभ मंगल ज्यादा सावधान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत ‘बधाई हो’, ‘ड्रिम गर्ल’ सारखे हटके आणि चौकटी बाहेरचे विषय घेऊन भूमिका साकारणाऱ्या आयुष्मान खुरानाने ‘शुभ मंगल ज्यादा ’ सावधानमध्ये कार्तिक सिंह नावाच्या भूमिकेतुन थेट समलैंगिक संबंधांच्या विषयाला हात घातला आहे. त्यामुळे इतर सगळ्या चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट नक्कीच खुप वेगळा ठरतो. आयुष्मान खुराना सोबत जितेंद्र कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

काय आहे कथानक

चित्रपटाच्या ट्रेलर वरुनच या चित्रपटाचा विषय काय आहे हे प्रेक्षकांना नक्कीच समजले असेल. या आधिदेखील समलैंगिक संबंधांवर भाष्य करणार अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. मात्र सरकारने समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता दिल्यानंतर केवळ कायद्यानेच नाही, तर समाजाने देखील ही भावना स्विकारण्याची गरज असल्याच या चित्रपटात दाखवण्यात आल आहे. अभिनेता आयुष्मान खुराना या चित्रपटात कार्तिक सिंह ही भूमिका साकारत आहे, तर अभिनेता जितेंद्र कुमार अमन त्रिपाठी नावाची भुमिका साकारत आहे. अमन आणि कार्तिक य़ा दोन तरुणांच एक मेकांवर प्रेम आहे, मुलगा आणि मुलगी यांच्या प्रेमा प्रेमाणेच दोन मुल किंवा मुलींच नैसर्गिकरित्या एकमेकांवर कस प्रेम होऊ शकत हे कार्तिक घरच्यांना पटवुन सांगत असतो. मात्र घरचे त्याला विरोध करतात आणि त्याला घरातून बाहेर काढतात.

नेमका विषय पोहोचवण्याचा प्रयत्न

यानंतर सुशीक्षित वैज्ञानिक असलेले अमनचे वडिल तरी आपल्याला समजुन घेतील असे त्यांना वाटते. मात्र वैज्ञानिक असून ही ते परिस्थिती न स्विकारता मुलाचा आजार बरा करण्यासाठी प्रयत्न करतात. ‘बधाई हो’ चित्रपटातील गजराज राव आणि नीना गुप्ता ही ‘बधाई हो’ चित्रपटातील सुपरहिट जोडी इथे पुन्हा पाहायला मिळत आहे. नेहमी प्रमाणे या जोडीने धमाल केली असून, या जोडीला मनुरिषी चढ्ढा, सुनीता राजवर आणि मानवी गगरू अशा उत्तम कलाकारांची साथ लाभली आहे. त्यामुळे अभिनयाच्या दृष्टीने हा चित्रपट उजवा आहे.

चित्रपटाचा विषय अगदी सहज आणि सोप्या भाषेत काहीसा कॉमेडी मात्र नेमका विषय प्रेक्षकां पर्यंत पोहोचवताना समलिंगींना असणाऱ्या भावना इतर नात्यां प्रमाण नैसर्गिक असतात. त्याच बरोबर नात्याच आणि संबंधांच हे वेगळे पण स्विकारतांना आई- वडिलांची प्राथमिक मानसिकता, एकीकडे मुलांवरच प्रेम आणि दुसरीकडे समाज. या सगळ्यांची अगदी छान मुठ बांधुन नेमका विषय दिग्दर्शक हितेश केवल्य यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे.

चित्रपटासाठी स्टार
3.5

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: