नागरिकत्व कायद्या (CAA) वरुन सध्या देशातलं राजकारण तापले असताना महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पाठींबा देण्याची घोषणा केली. या सरकारच्या पाठींब्याचा मनसेने समाचार घेतला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी, CAA ला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने सत्तेत आलेल्या शिवसेनेने CAA ला आता पाठींबा दर्शवला.
लोकसभेत CAA NRC ला पाठिंबा राज्यसभेत विरोध , पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा ,वाघ आहे का बेडूक…..
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 22, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर ट्वीटरवरून टीका केली आहे. लोकसभेत CAA NRC ला पाठिंबा राज्यसभेत विरोध , पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा,वाघ आहे का बेडूक अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. दरम्यान या टीकेवर शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.