रेल्वेच्या दुरूस्तीसाठी दर रविवारी रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉक जाहीर केला जातो. तर या रविवारीही रेल्वेच्या तिन्ही मार्गावर म्हणजेच मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात आलाय. या ब्लॉक दरम्यान रेल्वेच्या रूळांच्या देखभाल-दुरूस्तीचे कामे हाती घेतले जाणार आहेच. तसेच ब्लॉक काळात तिन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या 20 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते माटुंगा स्थानका दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.34 ते दुपारी 3.16 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
परिणाम
- डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर.
- रविवार वेळापत्रक आणि ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द.
- लोकल फेऱ्या सुमारे 20 मिनिटे विलंबाने.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेच्या मानखुर्द ते नेरूळ स्थानका दरम्यान अप-डाऊन मार्गावर सकाळी 10.34 ते दुपारी 3.16 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
परिणाम
- ब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल-वाशी-बेलापूर लोकल बंद.
- या काळात सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानका दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.25 वाजेपर्यंत ब्लॉक ठरविणार आला आहे.
परिणाम
- चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर.
- रविवारमुळे काही लोकल फेऱ्या रद्द.