नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वाको इंडियन ओपन इंटरनॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या आठ खेळाडूंनी सहभाग घेत, 8 पदकांची लयलूट केली आहे. यामध्ये खेळाडूंनी 2 सुवर्णपदक 3 रौप्यपदक व 3 कास्य पदकासह एकूण 8 पदकांची लयलूट केली. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
नवी दिल्लीच्या टालकटोरा इनडोर स्टेडियमवर 9 ते 13 फेब्रुवारी 2020 दरम्यान वाको इंडियन ओपन इंटरनॅशनल किकबॉक्सिंग टुर्नामेंट पार पडली. जगभरातून एकूण 9 देशांचा या स्पर्धेत सहभाग होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी भारतीय संघातून खेळताना 71 सुवर्ण पदक, 42 रौप्य पदक, 43 कांस्य पदक सह एकूण 156 पदकांची लयलूट केली. यामध्ये मुंबई विभागातून 8 खेळाडूंचा सहभाग होता. या आठही खेळाडूंनी प्रत्येकी एक-एक पदकाची लयलूट केली. यामध्ये शिल्पा बाबर, नावेज शेख व ऋषिकेश देवकर यांनी सुवर्ण पदक पटकावले. विवेक मौर्य, देवेश तोरसकर सागर कोकरे यांनी रौप्य पदक पदक पटकावले आहे. तर नितीन गोयकर, योगेश सावंत यांनी कांस्य पदक पटकावले आहे. सर्व खेळाडूंना शिटो रिऊ कराटे डो ट्रेनिंग अँड स्पोर्ट्स इन्स्टिट्युट मुंबईचे मुख्य प्रशिक्षक प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवले.