नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. भारतीय मानक ब्यूरोमध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतासाठी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2020 असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
पद आणि जागा
सदर भरतीत टेक्निकल असिस्टंट (लॅब) या पदासाठी 30 जागा आणि सिनिअर टेक्निशिअन यासाठी 20 जागा अशा एकूण 50 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह विज्ञान शाखेत पदवी (रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र किंवा जैव तंत्रज्ञान किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा जैव-रसायनशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स यासह मुख्य विषयांपैकी एक) (SC/ST:50% गुण) किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ केमिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ फूड टेक्नॉलॉजी/ मेटलर्जी डिप्लोमा (SC/ST:50% गुण)
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI ( इलेक्ट्रिशियन/ AC/ रेफ्रिजरेशन/ मेकॅनिक (डिझेल इंजिन)/ फिटर/ कारपेंटर/ वेल्डर) (iii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा
- पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
- SC/ST साठी 5 वर्षांची तर OBC साठी 3 वर्षांची सूट
शुल्क आणि परिक्षा
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रूपये तर मागासवर्गींयांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच भरतीसाठी उमेदवाऱ्यांची परिक्षा 29 मार्च 2020 ला असणार आहे.
अधिक माहितीसाठी – पाहा