नवीन पॅनकार्ड तयार करण्यासाठी मोठा खडाटोप करावा लागतो. पण आता आयकर विभागाने पॅनकार्ड मिळवण्यासाठी आता एक नवीन आणि सोप्पा पर्याय उपलब्ध करून दिलाय. तुमच्याकडे आधारकार्ड असल्यास सहज रित्या आणि मोफत ऑनलाइन पॅनकार्ड मिळवू शकता.
पाहूयात कशी आहे प्रक्रिया
- सर्वप्रथम https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN/index.html?lang=eng या लिंकवर जा.
- लिंक ओपन झाल्यावर समोर दोन पर्याय दिसतील त्यातील Get New PAN हा पर्याय निवडा.
- हा पर्याय निवडल्यास समोर एक ई-फार्म दिसेल. त्यात आधार क्रमांक आणि Captcha Code टाका.
- त्यानंतर आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो टाकल्यानंतर ई-पॅनकार्डची प्रक्रिया पूर्ण होईल.
- पुढे ईमेल आयडीचा पर्याय दिला जातो. यामुळे ईमेल आयडी पॅनकार्डशी जोडू शकतो.
कसा मिळवाल?
- दरम्यान संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर फार्म भरताना जो इमेल आयडी दिला असेल त्यावर पुढील लिकं पाठविली जाते.
- https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/ePANStatus.html?lang=eng वर जावून ई-पॅनकर्ड डाऊनलोड करा येऊ शकतो.