कंप्युटर हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. जगभरातील अब्जावधी लोक दररोज कंप्युटवर काम करत असताना वापरत असलेला कॉपी- पेस्टचा म्हणजेच control- C आणि control- v याचा शोध लावणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर लॅरी टेस्लर यांच वयाच्या 74 व्या वर्षी गुरुवारी निधन झाले आहे. त्यांनी cut, copy, paste चे जनक म्हणून देखील ओळखल जायच. संगणकीय वैज्ञानिक असलेल्या लॅरी टेस्लर यांचा जन्म न्यूयॉर्कमध्ये 1974 साली झाला. लॅरी टेस्लर यांनी 27 डिसेंबर 1979 ला केलेल्या एका प्रेजेंटेशनमध्ये त्यावेळी वापरलेल्या कंप्युटरमध्ये कॉपी पेस्टे या कमांड होत्या.
अॅपल- अॅमेझॉन साठी काम
कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफॉर्ड विद्यापीठातून लॅरी टेस्लर यांनी कंप्युटर इंजिनिअरिंगच शिक्षण घेतल. त्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी 1973 साली झेरॉक्स कंपनीमध्ये पहिली नोकरी केली. झेरॉक्स कंपनी मध्ये संशोधक म्हणून ते कामाला लागले. याच दरम्यान, सध्या आपण रोज वापरत असलेल्या कंप्युटरवरील कॉपी-कट-पेस्ट या संधेचा शोध लावला. त्याचबरोबर त्यांनी Find & Replace चा पर्याय शोधला. झेरॉक्स बरोबरच आपण कंप्युटरमध्ये प्रिंट काढताना वापर असलेल्या page layout चा शोध लॅरी कॅस्टर यांनी लावला.
1980 मध्ये लॅरी टेस्लर यांनी अॅपलमध्ये काम करण्यास सुरवात केली. कंप्युटरच्या शोधानंतर त्यात काही महत्वाचे बदल, नवीन फीचर्स आणण्यात लॅरी टेस्लर यांनी महत्वाचे योगदान दिले. अॅप्पलसाठी त्यांनी तब्बल 17 वर्ष काम केल. यानंतर 2000 मध्ये अॅपलमधुन बाहेर पडल्यावर त्यांनी सध्या जगभरात आघाडीवर असलेल्या आणखी एका कंपनी साठी काम करायला सुरवात केली. ती म्हणजे अॅमेझ़ॉन. 2001 ते 2005 मध्ये त्यांनी अॅमेझॉनसाठी काम केले. त्याचबरोबर त्यांनी काही काळ yahoo साठी देखील काम केले.
लॅरी टेस्लर यांच्या निधनाने एक हुशार इंजिनिअर- शास्त्रज्ञ हरवल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. लॅरी टेस्लर जरी हे जग सोडुन गेले असले तरी त्यांनी जगाला दिलेली कॉपी- पेस्टच्या सज्ञेतुन ते सदैव स्मरणात राहतील, अशी भावना अनेक भारतीय तंत्रज्ञांनी व्यक्त केली आहे.