वाचुन तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल मात्र हे खर आहे. एक महिला तिच्या मेंदुच्या ऑपरेशन दरम्यान, चक्क व्हायोलिन वाजवत होती. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केल आहे. सदर व्हिडिओ हा ब्रिटन मधील असून, एक महिला मेंदुच्या ऑपरेशन दरम्यान, व्हायोलिन वाजवण्यात दंग असल्याचे दिसत आहे. ऑपरेशन मग ते कोणतेही किंवा कितीही छोटे का असेना, जवळपास सगळ्यांच्याच धडकी भरवते. मात्र इथे ही महिला चक्क ऑपरेशन दरम्यान व्हायोलिन वाजवत आहे.
काय आहे कारण?
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या महिलेला ब्रेनट्युमर झाला होता. त्यामुळे ट्युमर काढण्यासाठी तिचे मेंदुचे ऑपरेश करणे गरजेचे होते. डॅगन टर्मर असे या महिलेचे नाव आहे. आपण गेल्या 40 वर्षांपासून व्हायोलिन वाजवत असून, मेंदुच्या ऑपरेशन नंतर आपण व्हायोलिन वाजवणे विसरणार तर नाही ना असे तिला वाटत होते. त्यामुळे आपण ऑपरेशन दरम्यान, व्हायोलिन वाजवण्याचा निर्णय घेतल्याचे या महिलेने सांगितले. मी 10 वर्षांची असल्या पासून व्हायोलिन वाजवते, मला व्हायोलिन वाजवणे खुप आवडत असल्याचे ऑपरेशन नंतर या महिलेने सांगितले.
डॉक्टरांनी केला सलाम
दरम्यान, ऑपरेशन होत असताना सदर महिला वेगवेगळ्या प्रकारच्या धुन आपल्या व्हायोलिनवर वाजवत असल्याचे रुग्णालयाचे डॉक्टर आश्कन यांनी सांगितले. या महिलेवर केलेल ट्युमरच ऑपरेशन यशस्वी झाले असून, तिच्या डोक्यातील 90 टक्के टयुमर काढण्यात आम्हाला यश आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र हा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांना चांगलाच धक्का बसला आहे.