न्यूझीलंड दौऱ्यातील वेलिंग्टन कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताचा डाव चांगलाच गडगडला. यामध्ये एकाही खेळाडूला डाव सावरता आला नाही. मात्र तरीही पहिल्या दिवशी चहापानाच्या सत्रानंतर भारतीय संघाने ५ गड्यांच्या मोबदल्यात १२२ धावांपर्यंत मजल मारली.या दिवशी मात्र मयंक अग्रवालच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद झाली.
नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने गोलंदाजीचा प्रथम निर्णय घेतला. तर केन विल्यमसनचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ करून दाखविला. भारताचे पहिल्या फळीचे फलंदाज सलामीवीर पुथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली लगेचच माघारी गेले. पण दुसरा सलामीवीर मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांनी संयमी खेळी खेळत भारताचा डाव सावरला.
सलामीवीर मयांक आणि अजिक्य रहाणे या जोडीने कणखरपणे न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करत पहिले सत्र खेळून काढले. मयांकच्या याच संयमी खेळीमुळे एक नव्या विक्रमाची त्याच्या नावे नोंद झाली आहे. सन 1990 नंतर मयांक हा न्यूझीलंडमध्ये कसोटी सामन्यात पहिले सत्र खेळून काढणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1990 साली नेपियर कसोटी सामन्यात मनोज प्रभाकर यांनी पहिले सत्र खेळून काढले होते.
Last Indian opener before Mayank Agarwal to survive the first session of a Test in New Zealand was Manoj Prabhakar in 1990 (95 in 268; Napier). #NZvIND
— Sampath Bandarupalli (@SampathStats) February 21, 2020
पहिले सत्र खेळून उपहारानंतर मयांक लगेचच माघारी परतला. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर उंच फटकार मारण्याच्या प्रयत्नात सीमेवर उभा असलेल्या खेळाडूने मयांकला माघारी पाठविले.