जगातील लोकसंख्येच्या बाबतीत चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे कुटुंब नियोजनासाठी देशातील एका सरकारने नसबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशाद्वारे लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारने एक अजब निर्णय घेतला आहे. पुरुष बहुउद्देशीय आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरुषांच्या नसबंदीसाठी टार्गेट देण्यात आले आहेत. 2019- 20 या आर्थिक वर्षात एकाचीही नसबंदी न करणाऱ्या कर्मचाऱ्याचे वेतन रोखण्यात येईल. तसेच काही वृत्तानुसार त्यांच्यावर सक्तीच्या निवृत्तीची कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने काढलेल्या या फरमाना विरोधात कर्मचाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजन सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार सध्या मध्य प्रदेशमध्ये नसबंदी केलेल्यांची आकडेवारी 0.5 टक्के इतकी आहे.
राष्ट्रीय आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारी नुसार राष्ट्रीय आरोग्य मिशन विभागाने लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या कडुन कामाचा आढावा घेत काम न करणाऱ्या तसेच कामाचा कोणताही रिझल्ट न मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकसंख्या नियंत्रणासाठी काही ठोस पावल उचलण्याचा मानस असल्याचे या विभागाच म्हणंन आहे. त्यासाठी विभाग निहाय कर्मचाऱ्यांना काही टार्गट ठरवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करु शकतो. मात्र लोकांना नसबंदीसाठी जबरदस्ती करु शकत नाही. असे म्हणत सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. कमलनाथ सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी टिका देखील केली आहे.
MP govt issues bizarre diktat, health staff asked to bring one man for sterilisation or lose job @ndtv @NHPINDIA @MoHFW_INDIA @AshwiniKChoubey #Delhi #BJP #CAA #Mahashivratri pic.twitter.com/QE2V84MqD2
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) February 21, 2020
राज्याचा लोकसंख्येचा दर
मध्ये प्रदेशची लोकसंख्या 7 कोटी इतकी असून, राज्यातील 25 जिल्ह्यांच्या प्रजननाचा दर 3 पेक्षा अधिक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वर्षाला कमीत- कमी 6 ते 7 लाख लोकांनी नसबंदी करावी असे सरकारचे उद्दीष्ट आहे. मात्र ताज्या आकड़ेवारीनुसार फेब्रुवारी 2020 पर्यंत मागील आर्थिक वर्षाच्या आकडेवारी नुसार नसबंदी केलेल्या पुरुषांची संख्या केवळ 3397 इतकी आहे.