उन्हाळ्याच्या सुट्टी त्यात लग्न सराईचा सीजन असल्यामुळे फिरण्यासाठी बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या खुप मोठी असते. त्यातल्या त्यात मुंबई कडुन कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तसेच गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील खुप मोठी असते. त्यामुळे रेल्वे ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दीचा विचार करुन प्रवाशांसाठी रेल्वेने कोकणात जाणाऱ्या चार समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 एप्रिल पासून या विशेष समर स्पेशल गाड्या मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानका पासून सावंतवाडी, करमाळी तसेच काही गाड्या पनवेल स्थानकातून चालवण्यात येणार आहेत.
या आहेत विशेष ट्रेन
एलटीटी-करमाळी
लोकमान्य टिळक टर्मिनस – करमाळी विशेष गाड्यांच्या 20 फेऱ्या होणार आहेत. 01047 ही रेल्वे 3 एप्रिल ते 5 जून दरम्यान दर शुक्रवारी रात्री 8.45 वाजता सुटणार असून करमाळीला दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवाशांसाठी 01048 ही रेल्वे 5 एप्रिल ते 7 जून दरम्यान दर रविवारी सकाळी 11 वाजता सुटणार असून एलटीटी रात्री 12.20 वाजता येणार आहे.
थांबा
या रेल्वेला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापुर, वैभववाडी, कणकवली, सिधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविंम या स्थानकात थांबा दिला आहे.
पनवेल-करमाळी
पनवेल-करमाळी रेल्वेच्या 20 फेऱ्या होणार आहे. 01049 रेल्वे 4 एप्रिल ते 6 जून दरम्यान दर शनिवारी रात्री 9 वाजता निघणार असुन करमळीला दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता पोहोचणार आहे.कोकणातून मुंबईत येण्यासाठी 01050 ही रेल्वे 4 एप्रिल ते 6 जून दरम्यान दर शनिवारी सकाळी 10.40 वाजता सुटणार असून पनवेलला रात्री 8.15 वाजता येणार आहे.
थांबा
या ट्रेनला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवी स्थानकात थांबा दिला आहे.
एलटीटी-करमाळी
एलटीटी-करमाळी ट्रेनच्या 18 फेऱ्या होणार आहेत.01045 रेल्वे 10 एप्रिल ते 5 जून दरम्यानदर शुक्रवारी रात्री 1.10 वाजता सुटणार असून करमळीला दुपारी 12.20 वाजता पोहोचणार आहे. परतीकरिता 01046 ही गाडी 10 एप्रिल ते 5 जून दरम्यान दर शुक्रवारी दुपारी 12.50 वाजता सुटणार असून एलटीटी रात्री 12.20 वाजता येणार आहे.
थांबा
या रेल्वेला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम स्थानकात थांबा असणार आहे.
एलटीटी-सावंतवाडी
एलटीटी-सावंतवाडी ट्रेनच्या 20 फेऱ्या होणार आहेत. 01037 ही गाडी 6 एप्रिल ते 8 जून दरम्यान दर सोमवारी रात्री 1.10 वाजता सुटणार असून सावंतवाडीला दुपारी 12.30 वाजता पोहोचणार आहे.