भारत देश हा अनेकविविध परंपरांनी, संस्कृतींनी नटलेला देश आहे. प्रत्येक प्रांताची भाषा निराळी, तेथील परंपरा निराळ्या, संस्कृती निराळी. आहे. त्यामुळे असेही म्हंटले जाते की, दर पाच मैलावर बोलीभाषा, राहणीमान बदलत जाते. मात्र इतक्या भाषा असून सुद्धा काही भाषा आपण विसरत चाललो आहे. या भाषा आपल्या बोली-चालीवर रहाव्या यासाठी जगभरात 21 फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन साजरा केला जातो.
कशी झाली सुरूवात
जगातील प्रत्येक नागरिकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो. तोच अभिमान जपण्यासाठी आणि संबंधित संस्कृती टिकवण्यासाठी 2000 पासून संयुक्त राष्ट्राकडून हा दिवस साजरा करण्यात सुरूवात झाली. दरवर्षी वेगवेगळ्या थीम निश्चित करून जगभरात हा दिवस साजरा करतात. गतवर्षी म्हणजेच 2019 ला ‘Indigenous languages as a factor in development, peace and reconciliation’ या थीमवर हा दिवस साजरा करण्यात आला होता.
नेमका हा दिवस का साजरा केला जातो?
‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा करण्याचे मुळ हे भारत पाकिस्तानची फाळणी आहे. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळताच 1948 साली तेथील मातृभाषा ऊर्दु असल्याचे जाहीर केली. पण पश्चिम पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशाला हे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी नव्याने लढायला सुरूवात केली होती. या लढ्याने अनेकांनी बलिदान दिले होते. त्यानंतर 1956 साली अखेर बंगाली ही पाकिनस्तानाची दुसरी अधिकृत भाषा झाली. अशा आपल्या मातृभाषेसाठी लढा पुकारणाऱ्या या मोहिमेला लक्षात घेत 21 तारखेला ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा करण्यास सुरूवात झाली. बांगलादेशमध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित केली जाते. तर भारताच्या पश्चिम बंगाल मध्ये मोठ्या उत्साहात मातृभाषेचा सोहळा साजरा केला जातो.