प्रत्येकाला अस वाटत असत की आपण सुंदर दिसाव. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे फेस वॉश, क्रिम यांचा वापर देखील करत असतो. इतकच काय तर सुंदर दिसण्यासाठी अनेक जण महागडी सौंदर्य प्रसाधने ही वापरत असत. मात्र वरुन सुंदर दिसण्याकडे आपण लक्ष देतो मात्र आतून सुंदर दिसण्याकडे आपण दुर्लक्ष करतो, ते म्हणजे आपले दात. दात हा अत्यावश्यक मात्र अनेकदा स्वच्छ्तेच्या बाबतीत दुर्लक्षित राहणारा अवयव ! दात पिवळे होणे हे तुमच्या शारीरिक अस्वच्छतेमुळे किंवा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे होऊ शकतात. एखाद्या सुंदर चेहऱ्याच्या व्यक्तीचे दात जर पिवळे असतील तर त्या व्यक्तीच्या सुंदरतेत नक्कीच फरक पडतो. त्यामुळे जाणून घेऊयात दात पिवळे पडण्याची कारण आणि त्यावर घरगुती उपाय.
कारण
1) दात नीट न घासल्याने हळुहळु दातांवर पिवळा थर जमायला लागतो, आणि मग दात पिवळे पडल्याचे स्पष्ट दिसायला लागते.
2) धुम्रपानाच्या अती सेवना मुळे तसेच चहा- कॉफी अती प्रमाणात घेतल्यानंतर देखील दात पिवळे होतात.
3) रात्री दररोज उशीरा जेवण करुन ब्रश न करता किंवा चुळ न भरता तसेच झोपल्याने.
4) ब्रश करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे किंवा ब्रश न बदलल्याने देखील दात पिवळे पडतात.
असा घालवा पिवळेपणा
वरील अनेक गोष्टींमुळे दातांवर चढलेला पिवळसर थर हा सिमेंट सारखा होतो. त्यामुळे कितीही जोरात दात घासले तरी हा पिवळसर थर निघत नाही. तसेच डेंटल क्लिनिंग किंवा दातांचा डॉक्टरांकडे जाण्याचा खर्च नेहमी परवडण्या सारखा नसतो. तेंव्हा हे घरगुती उपाय करा.
1) लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आणि त्याने दातांवर ब्रश करा. दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.
2) एक चमचा लिंबाचा रस घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ घालून त्याने दातांची मॉलिश करायला पाहिजे. दात एकदम स्वच्छ होतील.
3) टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असते. टोमॅटोचा रस दातांसाठी खूप चांगला असतो. टोमॅटोच्या रसाने दातांवर मसाज केल्यानंतर थोड्यावेळाने ब्रश करा. या उपायने दात पांढरे शुभ्र होतील.
4) स्ट्रॉबेरी दात चमकदार बनवण्याचा सर्वात टेस्टी उपाय आहे. स्ट्रॉबेरीमध्ये आढळून येणारे मॅलिक एसिड दातांना पांढरे आणि मजबूत करते. स्ट्रॉबेरीचे काही तुकडे घेऊन त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा मिसळून घ्या. ब्रश केल्यानंतर हे मिश्रण दातांना लावा.
असे घासावे दात
तोंडात फोम तयार होण्याला वेळ मिळावा म्हणून आधी सर्व दातांना पेस्ट लावून घ्यावी, एखादे मिनिट थांबावे आणि मग दातांवरून ब्रश फिरवावा. दातांवरून ब्रश फिरवताना हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे अशा दिशेनेच ब्रश करावे. उलटे ब्रश करू नये. वरचे दात आणि खालचे दात वेगवेगळे साफ करावे. दात साफ करताना, दाताच्या मागच्या बाजूनेदेखील हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे ब्रश फिरवणे महत्वाचे. दाढांचा चावण्याचा सर्फेस साफ करताना मागे पुढे असा ब्रश फिरवावा. दातांचा ओठाकडील, गालाकडील आणि जिभेकडील सर्फेस साफ करताना कधीही आडवा ब्रश फिरवू नये.