खूप कमी वेळात लोकप्रिय ठरलेला व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म ‘Tik Tok’ आपल्या युजर्सच्या सेवेत लवकरच एक नव फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरचे नाव ‘Family Safety Mode’ असे असून या फीचरमुळे पालकांना आपल्या मुलांच्या अकाऊंटवर कंट्रोल ठेवता येणार आहे.
दरम्यान, या नव्या फीचरवर कंपनीचे काम चालू आहे. ‘Tik Tok’ च्या सर्वात लोकप्रिय युजर्ससोबत या फीचरची चाचणी केली जात आहे. हे नवे फीचर कंपनीकडून युजर्सना सुरक्षित वाटावे यासाठी आणले जात आहेत. तर आता येणाऱ्या नव्या फीचरमुळे पालकांना आपल्या मुलाच्या ‘Tik Tok’ अंकाऊटला कंट्रोल करता येऊ शकतो. तसेच युजर्स किती वेळ ‘Tik Tok’ वर घालवतात हे हि पालकांना कंपनीकडून कळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
‘Tik Tok’ ची भारतातील लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढतच जात असल्याचे दिसत आहे. 2018 च्या तुलनेने 2019 मध्ये ‘Tik Tok’ चे युजर्स सहा पटीने वाढले असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तब्बल 5.5 अब्ज तास 2019 सालामध्ये युजर्सनी ‘Tik Tok’चा वापर केला आहे. तर आता 2020 मध्ये येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सवर परिणाम काय होत हे पाहण औस्तुक्याचे ठरणार आहे.