दरवर्षी मराठी महिन्यातील माघ वद्य त्रयोदशीला येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रिचा उत्सव संपुर्ण देशात साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे पहिल्याच प्रत्येक मराठी महिन्यात एक शिवरात्र येत असते. मात्र दरवर्षी माघ महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते. पुराण कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती देवी यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी भगवान शंकर लिंग स्वरुपात प्रकट झाले होते, म्हणून आजच्या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो, असे देखील म्हटले जाते. शंकर हा रागिष्ट, मात्र लवकर प्रसन्न होणारा देवता असल्याचे पुराणात म्हंटले जाते.
वर्षभरात केली जाणारी शिव व्रते
जगभरात महान भगवान शिवाला मानणारे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. सोमवार हा दिवस शंकराचा दिवस म्हणून मानला जातो. अनेक जण वर्षाचे बाराही महिने भगवान शंकराच्या नावाने दर सोमवारी एक वेळेचा उपवास करतात. तसेच मराठी महिन्यात येणाऱ्या श्रावण महिन्याला पवित्र महिना मानले जाते. या महिन्यात भगवान शंकराच्या नावाने अनेक जण उपवास करतात. त्याला श्रावणी सोमवार म्हणतात. त्याचबरोबर श्रावण महिण्यापासून भगवान शंकराला प्रसन्न करुन घेण्यासाठी, किंवा एखादी इच्छा मनात ठेवुन 16 सोमवाराचे शंकराचे व्रत केले जाते. त्याच प्रमाण भाद्रपद त्रयोदशीला म्हणजे गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी स्त्रिया चांगला वर मिळावा यासाठी पार्वतीने केलेले हरतालिकेचे व्रत करतात. या व्यतिरिक्त भगवान शंकराची मनापासून श्रध्दा आणि आराधणा ही वर्षाचे 365 दिवस करता येते. मात्र ज्यांना ही सगळी व्रते किंवा उपवास करता येत नाही अशा सगळ्यांना महाशिवरात्रीचे व्रत मनोभावे केल्यास भगवान इतर सगळ्या उपवासांचे फळ मिळते.
दंत कथा
महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी आजचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ ते ३ या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून त्याला ते अर्पण केले जाता. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. त्याला बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो.
आख्यायिका
समुद्र मंथनाच्यावेळी निर्माण झालेल्या हलाहल विषामुळे संपुर्ण विश्वाचा नाश होणार होता. त्यावेळी कोणीतरी हे विष प्राशण करणे गरजेचे होते. भगवान शिवामध्येच त्या विषाचा दाह सहन करण्याची ताकद होती. शिवाने ते विष प्राषण केल्याने त्याच्या घशात प्रचंड जळजळ व्हायला सुरवात झली. तेंव्हा भगवान शिवाच्या डोक्यावर बेल पत्र ठेवण्यात आले. त्यामुळे त्याला थंड वाटु लागल्याने तेंव्हा पासून शिवाला बेल पत्र वाहण्यास सुरवात झाली. आणि त्या दिवसापासून त्याचा गळा ही निळा झाला. म्हणूनच शिवाला निळकंठ हे नाव पडले