नेहमीच आपल्या आक्रमक खेळीमुळे भारताला विजयाच्या दिशेने नेणारा आणि हिटमॅन अशी ओळख असलेल्या सलामीवीर रोहित शर्मा सध्या पुढील नियोजित सामन्यांसाठी जोरदार तयारी करत आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील दुखापतीमुळे रोहितला या दौऱ्याला मुकावे लागले होते. मात्र, आता त्याचे लक्ष असणार ते दक्षिण आफ्रिकेच्या वनडे मालिका आणि येत्या 29 मार्चला सुरू होणाऱ्या आयपीएलच्या मालिकांकडे. तत्पुर्वी रोहितने नुकतेच आपलया सोशल मीडियावरून एक इच्छा व्यक्त केली आहे.
रोहित शर्माने केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील मोटेरा या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर कधी एकदा खेळतो आहे असे त्यांनी म्हंटले आहे. त्यासोबत रोहितनी ‘BCCI’ने शेअर केलेला स्टेडियमचा एरिअल व्ह्यूची फोटोही शेअर केला आहे. तसेच रोहिने या स्टेडियममध्ये खेळण्याची वाट पाहू शकत नाही असे ही म्हटले आहे.
Looks amazing heard so much about it, can’t wait to play there @BCCI 😁 https://t.co/0bb5rLpSGr
— Rohit Sharma (@ImRo45) February 19, 2020
अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमाचा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष परिमल नाथवानी यांनी जानेवारी 2019 मध्ये फोटो शेअर केला होता. हे मैदान प्रेक्षकांच्या बसण्याच्या क्षमतेबाबत मेलबर्न क्रिकेट मैदानापेक्षा मोठे असेल. मेलबर्न मैदानावर एकाच वेळी 1 लाख प्रेक्षक सामना पाहू शकतात. तर मोटेरा मैदानावर 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसू शकतात. या स्टेडियमचे येत्या 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड टॅम्प यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
The Sun is out! 🌞#MoteraStadium
Ahmedabad, India 🇮🇳 pic.twitter.com/JYAC886Bd4— BCCI (@BCCI) February 19, 2020