मुंबईच्या वेशीवर असलेल्या मीरा भाईंदर येथील एका पंचतारांकित हॉटेलला लष्करे तोयबा या दहशदवादी संघटने मेल पाठवून घातपात करण्याची धमकी देऊन 100 बीट कॉईनची खंडणी मागितली आहे. या संदर्भात मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
बुधवारी सकाळी मीरारोड परिसरात असेलल्या माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पंचतारांकित ७ /११ हॉटेल च्या इमेल आयडी वर लष्करे तोयबा या दहशदवादी संघटनेचा मेल आल्याने एकच खळबळ माजली. हॉटेलच्या मेनेजरने सदराचा इमेल पाहून मालक नरेंद्र मेहता यांना या संदर्भात माहिती दिली. नरेंद्र मेहता त्यांनी लागलीच पोलिसांना या माहिती देऊन सदराचा इमेल दाखवला. पोलिसांनी लागलीच हॉटेल संपूर्ण कारभार थांबवत आजच्या दिवसासाठी हॉटेल बंद केले आणि पुढील तपास सुरु केला आहे. नरेंद्र मेहता यांनी माहिती दिली की, सदराचा इमेल हा त्यांना सकाळी प्राप्त झाला इंग्रजी भाषेत असून या इमेलमध्ये “ आम्ही लष्करे तोयबा असून पाकिस्तान आणि खिलाफत चे समर्थक आहोत. आमचा शहीद पुढील 24 तासाच्या आत तुमच्या हॉटेल स्फोटके घेऊन दाखल होईल आणि मोठा रक्तपात करेल, आम्ही तुम्हाला आज्ञा देतो की सदराचा सदरचे ऑपरेशन जर तुम्हाला थांबवायचे असेल आणि कोणताही रक्तपात हवा नसेल तर तुम्ही आमच्या खात्यावर 100 बीट कॉईन म्हणजे 7 कोटी रुपये जमा करा. 24 तासाच्या आता जर आम्हाला पैसे मिळाले नाहीत आणि जर आम्ही तुमच्या हॉटेल मध्ये स्फोटके पेरण्यास असमर्थ झालो तर आम्ही तुमच्या हॉटेल मधील ग्राहकांना बंदी बनवून लहान मुलांना त्यांच्या कुटुंबांना आणि तुमच्या कर्मचार्यांना मारून टाकू, तुमच्या मालकाला सांगा हा कोणताही जोक नाही आहे, आणि जर घातपात झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असणार, आम्ही अल्लाह च्या नावाखाली मारायला तयार आहोत आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही”
अशा प्रकारची धमकी या इमेल मध्ये देण्यात आली आहे. या संदर्भात माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी मिरारोड शांताराम वळवी यांनी माहिती दिली आहे की, सदरचे प्रकरण आम्ही गंभीरतेने घेतले असून या संदर्भात मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आम्ही सदराचा इमेल कुठून आला आणि त्यामागे कोण आहेत याचा शोध घेत आहोत.
सदरचा इमेल हा पनामा येथून आला असल्याची माहिती नरेंद्र मेहता यांनी दिली आहे, याच प्रमाणे मुंबईच्या आणखी दोन पंचतारांकित हॉटेलला सुद्धा अशाच प्रकारे धमकीचा मेल आल्याची माहिती मिळत आहे.