बॉलिवूडचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी आपले 2020 चे नवे कलेंडर लॉन्च केले. आपल्या परिवारासह मीडियाच्या उपस्थितीत सोमवार, 17 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता हा सोहळा पार पडला. कलेंडर लॉन्चिंगच्या या सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित होते. एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा, जॅकी श्रॉफ, विद्या बालन यांच्या सह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी या सोहळ्याला हजेरी लावली.
डब्बू रतनानी दरवर्षी आपल्या कलेंडरमध्ये काही विशेष आणि हटके करतात. त्यामुळे यंदा कलेंडरमध्ये काही नवीन पाहायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. तर 2020 च्या कलेंडरमध्ये आपल्याला कियारा आडवाणी आणि भूमी पेडणेकर या दोन अभिनेत्रींचा अत्यंत बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. कलेंडर लॉन्चिंग नंतर या दोन अभिनेत्रींचे फोटोज समोर आले आहेत. त्यात दोघींचाही सेक्सी अवतार पाहायला मिळत आहे.
कियारा अडवाणी
डब्बू रतनानी यांच्या 2020 च्या कलेंडरसाठी कियारा आडवाणी टॉपलेस (Topless) झाली असून तिचा अत्यंत हॉट अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे.

कियारा आडवाणी (Photo Credits: Yogen Shah)
भूमी पेडणेकर
2020 कलेंडरवर भूमी न्यूड (Nude) अवतारात दिसत आहे. बाथटबमध्ये बसलेल्या भूमीचा बोल्ड अंदाज घायाळ करणार आहे.

भूमि पेडनेकर (Photo Credits: Yogen Shah)
विद्या बालन
त्याचबरोबर या कलेंडरवर अभिनेत्री विद्या बालन देखील सेक्सी अवतारात दिसत आहे. कलेंडर लॉन्चिंग इव्हेंटमध्ये विद्या आपल्या कलेंडरवरील फोटोसह पोज देताना दिसत आहे.

Vidya Balan (Photo Credits: Yogen Shah)
चाहत्यांना देखील आपल्या लाडक्या सेलिब्रेटींचा हा अंदाज भावला असून आता 2020 चे नवे कलेंडर सर्वांसाठी कधी खुले होणार, याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.