नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रासाठी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2020 असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
पद आणि जागा
सदर भरतीत प्राध्यापक (गट अ) पदासाठी 7 जागा, सहयोगी प्राध्यापक (गट अ) साठी 11 जागा आणि सहाय्यक प्राध्यापक (गट ब) पदासाठी 45 जागांसाठी म्हणजेच एकूण 63 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: (i) संबंधित विषयात DM/M.Ch/MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) संबंधित विषयात DM/M.Ch/MD/MS/DNB (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.3: संबंधित विषयात DM/M.Ch/MD/MS/DNB
वयोमर्यादा
- पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
- मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट
शुल्क
दरम्यान या भरतीसाठी खुला प्रवर्गातील उमेदवाऱ्यांना 524 रूपये तर मागासवर्गीयांसाठी 324 रूपये शुल्क आकारण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी- पाहा