भारतात लोकप्रिय ठरलेली चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीच्या ‘Redmi Note 8’ सीरिजमधील ‘रेडमी नोट 8’ आणि ‘रेडमी नोट 8 प्रो’ हे स्मार्टफोन काही महिन्यांपूर्वीच लाँच केले होते. लाँच होताच या स्मार्टफोनच्या खरेदीला युजर्सने चांगलाच प्रतिसाद दिला होता. सुरूवातीच्या तीन महिन्यातच 1 कोटीहून अधिक स्मार्टफोनची विक्री झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ‘नोट 8 प्रो सीरिज’ला उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे कंपनीकडून या सीरिजच्या स्मार्टफोनची अधिक विक्री व्हावी यासाठी जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे. कंपनीकडून ग्राहकांना अधिक स्वस्तात स्मार्टफोन खरेदी कराता यावा यासाठी या सीरिजच्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
फीचर्स
- 6.53 इंचाचा डिस्प्ले
- स्लो-मोशन व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फीचर
- उत्तम गेमिंग अनुभवासाठी यामध्ये लिक्विड कूलिंग सपोर्ट
- MIUI 10 Android 9 Pi वर कार्यरत
- मीडियाटेक हेलियो G90T chipset चा सपोर्ट
- 4500 mAh क्षमतेची पावरफुल बॅटरी
- 64+8MP+2MP+2MP क्षमतेचे मागिल बाजूस कॅमेर
- सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा
- गामा ग्रीन, हॅलो व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन कलर्समध्ये उपलब्ध
Redmi Note 8 pro च्या व्होरिअंटच्या किंमती
- 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज हे व्हेरिअंट 13 हजार 999 रुपये
- 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये
- 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17 हजार 999 रुपये