महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या १९ फेब्रुवारीला भारतात साजरी होणार आहे. तद्पुर्वी सातासमुद्रापार शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मावळ्यांनी मोठ्या उत्साहात हि जयंती साजरी केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा भारत सरकारचे वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यामानाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्रा बरोबरच गेल्या सात वर्षांपासून अमेरिकेतही शिवजयंती साजरी केली जाते.भारतातील छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल या वर्षीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिवजयंती उत्सवा निमित्त कलाकारांनी महारांजाचा राज्याभिषेक सोहळा, शिवजन्मोत्सवावर आधारित अनेक सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. शिवजयंतीचा डंका महाराष्ट्राबरोबरच अमेरिकेतही वाजवला जातो याबद्दल मान्यवरांनी अभिमान असल्याच्या भावना व्यक्त केल्या.त्याचबरोबर शिवरायांची अमेरिकेत अशी जयंती उत्साहात साजरी झाली.