सरकारी नोकर भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवाऱ्यांसाठी आनंददायी बातमी आहे. सीमा सुरक्षा दलात विविध जागांसाठी ही भरती जाहीर झाली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 असून ही भरती संपूर्ण भारतासाठी असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
पद आणि जागा
सदर भरतीत सब इस्पेक्टर (मास्टर) पदासाठी 5 जागा, सब इस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) साठी 9 जागा, सब इस्पेक्टर (वर्क शॉप) साठी 3 जागा, हेड कॉन्स्टेबल (मास्टर) साठी 56 जागा, हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) साठी 68 जागा, हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) साठी 16 जागा आणि कॉन्स्टेबल ट्रेड्समन (क्रू) साठी 160 जागा अशा एकून 317 जागांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
- पद क्र.3: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/मरीन ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सेरंग प्रमाणपत्र
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटार मेकॅनिक/ मेकॅनिस्ट/ कारपेंटर/ इलेक्ट्रिशियन/ AC टेक्निशियन/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्लंबर)
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा
- पद क्र.1 ते 2: 22 ते 28 वर्षे
- पद क्र.3 ते 7: 20 ते 25 वर्षे
- SC/ST साठी 5 वर्षांची तर OBC साठी 3 वर्षांची सूट
शुल्क
सदर भरतीत सब इस्पेक्टर (मास्टर) आणि सब इस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) यासाठी खुल्या वर्गातील उमेदवारांना 200 रूपये, सब इस्पेक्टर (वर्क शॉप), हेड कॉन्स्टेबल (मास्टर), हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर), हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप), कॉन्स्टेबल ट्रेड्समन (क्रू) या पदांसाठी खुल्या वर्गातील उमेदवाऱ्यांना 100 रूपये शुल्क आकारण्यात आला आहे. तर मागासवर्गीयांसाठी सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अधिक माहितीसाठी- पाहा