अभिनेत्री सायली संजीव आणि सुव्रत जोशी ही नवी कोरी जोडी आणि मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लिखित-दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. तर आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
ट्रेलरमध्ये काय?
सायली आणि सुव्रत सोबत अंजली पाटील, अंकित मोहन हे कलाकारही प्रमुख दिसणार आहेत. ही चार तरूणांची गोष्ट असून नात्यांची गुंतागुंत या भोवती फिरणारी चित्रटाची कथा आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये अरेंज मॅरेंज झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्यात रात्री भूषणच्या डोळ्या समोर उभा राहणारा भूतकाळ आणि त्यानंतर नात्यात निर्माण झालेली गुंतागुंत पाहायला मिळत आहे.
दरम्यान मन फकीरा चित्रपटाचे संगीत वैभव जोशी आणि क्षितिज पटवर्धन यांनी केले असून सौमिल श्रुंगारपुरे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. तर हा चित्रपट येत्या 6 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पदर्शित होणार आहे.