महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज देशभरात जयंती साजरी केली जाणार आहे. यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य भगवमय झालेले असणार आहे. दरम्यान शिव जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बातमीदार तर्फे आपणाला शुभेच्छा…
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती आहे. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 शुक्रवार 19 फेब्रुवारी 1660 ही शिवरायांची जन्मताऱीख या दिवशी महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराजांची जयंती साजरी केली जाते. छत्रपतींच्या जन्मा विषयी अनेक वाद असून, त्या काळी लिहील्या गेलेल्या बखरींमध्ये वेगवेगळे संदर्भ दिले गेले असून, त्यानुसार तारखे नुसार, तिथिनुसार अशी शिवजयंती साजरी केली जाते. 1869 साली महात्मा ज्योतीबा फुले यांनी सगळ्यात आधी रायगडावरील महाराजांची समाधी शोधुन काढली. छत्रपतींचे कार्य घराघरात पोहोचावे या उद्देशाने मग पुढे 1870 पासून ज्योतीरावांनी पहिली शिवजयंती सुरु केली. पुण्यात शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पार पडला, आणि तो आजतागायत सुरु आहे.
इतिहास
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात. निजामशाही, आदिलशाही साम्राज्य विरुद्ध लढा देत महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. 1674 साली महाराज्यांचा शिवराज्याभिषेक सोहळा इतिहासातील एक गौरवशाली दिवस होता, जो जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीला गेला. महिलांविषयी नितांत आदर, शत्रुच्या घरातील महिलां प्रती देखील तिच भावना. आपला प्रत्येक सैनिकांपासून सरदार सगळ्यांना समान वागणुक देणारे शेवटच्या श्वासा पर्यंत जनतेच्या सेवेसाठी स्वताला वाहुन घेतलेले असे राजे इतिहासात पुन्हा झाले नाहीत.
महाराजांच्या शौर्याच्या गाथा सांगणारे गड किल्ले आजही महाराज्यांच्या शौर्याच्या गाथा सांगतात. महाराजांनी आपल्या कारकीर्दीत तब्बल 400 किल्ले जिंकले. महाराजांनी हे जग सोडुन 300 वर्षे उलटुन गेली तरी आजही इतिहासातील त्यांनी केलेली युद्ध, त्यांच्या खुणा आणि दस्ताऐवज बघितल्यावर सगळ्या जिवंत इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारे शिवाजी महाराज हे त्या काळात एक आगळेवेगळे राजे म्हणून जाणले जातात. प्रजेला सवलती देणारा राजा ही संकल्पनाच त्या मध्ययुगामध्ये क्रांतीकारक ठरलेली होती. म्हणूनच शिवाजी महाराजांविषयी असे म्हटले जाते की, राजे तर अनेक होऊन गेले, पण त्यातल्या कोणत्याही राजाला प्रजेने देवाचा अवतार मानलेले नव्हते. शिवाजी महाराजांना मात्र जनतेने देवाचा अवतार मानलेले होते.