पवई तलाव परिसरातून प्लॅंट अन्ड एनिमल वेल्फेअर सोसायटी आणि अम्मा केअर फाऊंडेशनच्या सदस्या निशा कुंजु आणि हितेश जाधव यांनी दिले दोन कासवांना जीवदान दिले आहे. हे कासव इंडियन सॉफ्टशेल प्रजीतीचे असून, पवाई तलाव परिसरात दोन मुलांकडे हे कासव आढळुन आले. ही कासव ती मुल पाळण्या साठी घरी घेऊन जात होती. संस्थेच्या एक सदस्या सविता करलकर यांनी ही कासव मुलांकडे दिसल्यावर त्यांनी संस्थेला फोनवरुन सदरची माहिती दिली. त्यानंतर सदर ठिकाणी पोहोचत त्य़ांनी या कासवांना ताब्यात घेतले.
एक कासव जखमी
दरम्यान, हे कासव ताब्यात घेतल्या नंतर यातील एका कासवाच्या तोंडात सेफ्टी पीन अडकलेली असल्याचे अढळुन आले. सदर पिन काढुन या कासवांना उपचारांसाठी पशुवैद्यांकडे नेण्यात आले. दरम्यान, कासवांची विक्रि करणे किंवा त्यांची शिकार करण्यास बंदी असून, असा प्रकार होत असल्याचे अढळुन आल्यास संस्थेच्या 9833480388 या हेल्पलाईनवर किंवा वनविभागाच्या 1926 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन्याजीव संरक्षक सुनीष सुब्रम्हण्यम यांनी केले आहे.