सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ ट्रेंड करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला अवघे काही तास शिल्ल्क राहिलेले असताना छत्रपतींना सोशल मीडियावरुन मानाचा मुजरा दिला जात आहे. अनेकांचे व्हाट्सअप्, फेसबुक स्टेटसवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या शोर्याच्या गाथांचे, राज्याभिषेकांचे व्हिडीओ, पोवाडे पाहायला मिळत आहेत.
सगळ्यात आधी सोशल मीडियावर शिवजयंतीचा एक व्हिडिओ अवघ्या काही तासातच प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांच्या व्हॉटसअप, फेसूबुक आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ स्टेटसवर पाहायला मिळाला. या व्हिडिओत एक तरुणी सुरवातीला पाठमोरी चालताना दिसत आहे, ती मराठमोळ्य़ा पोशाखात दिसत असून, तिच्या कडे बघुन लोक तिला वंदन करताना दिसत आहे. यानंतर शेवटी त्या मुलीच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती दिसत असल्याच या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक होत असतानाचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करतोय. या व्हिडिओत मागे भगवा झेंडा फडकताना दिसतो, आणि छत्रपती शंभु महादेवाच्या शिवलिंगासमोर हात जोडुन बसलेले दिसत आहेत. उत्सव आमच्या राज्याचा अशा आशयाचा बॅनर, ढोलताशांच्या तालावर नाचवले जाणारे भगवे झेंडे आणि छत्रपतींच्या नावाचा जयजयकार ही असा एका व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘राजा शिव छत्रपती’ मालिकेच टायटल सॉंग ‘जय भवाजी जय शिवाजी’ असे अनेक व्हिडिओ जाणता राज्याच्या जयंतीच्या पुर्व संधेला सोशल मीडियावर धुमाकुळ घालतायत.