सर्व क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागून राहिलेल्या ‘IPL’ च्या तेराव्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे. येत्या 29 मार्चपासून या हंगामाला सुरूवात होणार आहे. या हंगामातील सलामीचा सामना मुंबई मधील वानखेडे मैदानात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपरकिंग यांच्यात रंगणार आहे. तर शेवटचा सामना 17 मे २०२० रोजी होणार आहे.
‘IPL 2020’ सामन्यांअगोदर एक चॅरिटी सामना खेळविला जाणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. तसेच या सामन्यात माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा एकाच संघात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, BCCI चे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी या चॅरिटी सामन्यांचे संकेत दिले आहेत.
पाहा IPL चे पुर्ण वेळापत्रक
#IPL2020 schedule ❤😍 pic.twitter.com/bOsEvypclR
— VIVO IPL 2020 (@IPLCricket) February 15, 2020
लवकरच सुरू होणाऱ्या IPL च्या हंगामात 8 संघात चुरस रंगणार आहे. याच आठ संघातील खेळाडूंचे दोन संघात विभाजन केले जाणार आहे. उत्तर-पूर्व या संघात पंजाब, दिल्ली, कोलकत्ता आणि राजस्थान यातील खेळाडू एका संघात असतील आणि पश्चिम-दक्षिण भारतातील संघात मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबात या संघातील खेळाडू असणार असल्याचे सांगितले जात आहे.
वरिल प्रमाणे चॅरिट सामन्याचे संघ निश्चिती झाल्यास पुन्हा एकदा महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्माला एकत्र खेळताना पाहायला मिळणार आहे. IPL मालिकांमधून अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून वेगळा झालेला महेंद्र सिंग धोनी पुनरागमन करणार आहेत.