प्रवासी जेव्हा दुस-या देशात जातात तेव्हा त्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण देशांप्रमाणे तेथे चालणारे नियम बदलतात. यामुळे आपल्या देशात सामान्य वाटणाऱ्या गोष्टी परदेशात बॅन असू शकतात. जाणून घेऊया काही अशा गोष्टी…!
कित्येकदा लोक भारतात सार्वजनिक ठिकाणी पोटातील गॅस सोडतात (पादतात). बऱ्याचदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. मात्र फ्लोरीडामध्ये संध्याकाळी 8 च्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गॅस सोडणे बेकायदेशीर आहे. त्यातही गुरुवारी. ग्रीसमध्ये काही शहरात महिलांना हिल्स घालण्यास मनाई आहे, येथील शासनाचे म्हणणे आहे की, त्यामुळे येथील मुल्यवान दगड खराब होतात.
रमजानच्या काळात सौदी अरेबियामध्ये सार्वजनिक ठिकाणी काही खाण्यास मनाई आहे, खाताना आढल्यास त्याला तुरुंगावास होऊ शकतो. तसेच सौदी अरेबियामध्ये दारु पिण्यास बंदी आहे. दारु पिताना आढळल्यास कठोर शिक्षा होऊ शकते. पाकिस्तान व सौदी अरेबियामध्ये व्हेलेन्टाईन डे साजरा करण्यास बंदी आहे. तसेच यासंबंधी जाहीरात करण्यासही येथे बंदी आहे.
लाल सिग्नल लागल्याशिवाय रोड क्रॉस करणे अमेरिकेत बेकायदेशीर आहे. असा प्रयत्न कोणीही केल्यास त्याला तरुंगवासाची शिक्षा आहे. असा नियम भारतातही आहे. पण कोणीही याचे पालन करताना दिसत नाही. स्विर्त्झलँडमध्ये रात्री 10 नंतर फ्लश करण्यास मनाई आहे. त्यामुळे आसपासच्या लोकांना यामुळे त्रास होतो. गृप जॉगिंग करण्यास मनाई आहे.
ओंटेरियोतील प्रट्रोलियामध्ये मोठ्या आवाजात गाणे म्हणणे, शिटी वाजण्यास मनाई आहे. तसेच शहरात मोठ्याने ओरडण्यासदेखील मनाई आहे. डेन्मार्कमधील पालकांना आपल्या मुलाचे नाव ठेवता येत नाही. सरकारने 7 हजार नावे निश्चित केली आहेत. या नावांव्यतिरिक्त वेगळे नाव ठेवायचे असल्यास आधी सरकारची परवानगी घ्यावी लागते.