Ads
बातम्या

आता बनवू शकाल स्वत:चे इमोजी; गुगलचे नवे फीचर

डेस्क desk team

सोशल मीडियाचा वापर करताना अनेक जण मेसेजमध्ये तर कधी कधी नुसती इमोजी सेन्ट करून संवाद साधत असतात. अनेकांना आपल्या मेसेजमध्ये इमोजींचा वापर करायला फार आवडत असत. अशा इमोजींचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी गुगलने एक नवे फिचर्स आणले आहे. या फीचरचे नाव आहे ‘इमोजी किचन’ (Emoji kitchen).

या फीचरद्वारे युजर्सना आपल्या आवडीचे इमोजी मर्ज करुन नवीन इमोजी बनवू शकणार आहेत. गुगलने हे फीचर रोलआऊट करण्यास सुरूवात केलीये. या फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सना प्ले-स्टोअरमध्ये जाऊन ‘गुगल जीबोर्ड अॅप’ अपडेट करावे लागणार आहे.

या फीचर्स आधी गुगलने प्रीपेड युजर्ससाठी मोबाइल रिचार्ज करण्याचे फीचर आणले होते. गुगलच्या या नव्या फीचरद्वारे अँड्रॉइड फोनवर प्रीपेड मोबाइल रिचार्ज प्लॅन्स सर्च करता येतात, तसेच कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे याची तुलनाही करता येते. याशिवाय सर्चद्वारेच तुम्ही मोबाइलही रिचार्ज करु शकतात.

या फीचरचा कसा करायचा वापर?

  • गुगलच्या या नव्या फीचरद्वारे युजर्स Google Search चा वापर करुन केवळ स्वतःचाच नाही तर इतरांचाही नंबर रिचार्ज करु शकतात.
  • याचा वापर करण्यासाठी युजर्सना आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये prepaid Mobile recharge, Sim recharge किंवा recharge यांसारखे शब्द टाकून सर्च करावं लागेल.
  • यानंतर रिझल्टमध्ये तुम्हाला मोबाइल रिचार्ज सेक्शन (Mobile recharge Section) दिसेल. येथे युजर्सना मोबाइल नंबर, टेलिकॉम ऑपरेटर आणि सर्कल यांसारखे पर्याय निवडावे लागतील.
  • काही युजर्सना सर्चमध्ये ही सर्व माहिती आधीच भरलेली दिसू शकते. यानंतर युजर्सना Browse Plans वर क्लिक करावं लागेल.
  • आता गुगल तुम्हाला तुम्ही निवडलेल्या टेलिकॉम ऑपरेटरचे सर्व उपलब्ध प्रीपेड प्लॅन्स दाखवेल. समोर आलेल्या यादीमधून तुम्ही आवडीचा रिचार्ज प्लॅन निवडू शकतात.
  • एकदा प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर व्हॅलिड ऑफर्सची यादी येईल. यानंतर युजर्स ऑफर प्रोव्हाइडर्सवर टॅप करु शकतात. सध्या Freecharge, MobiKwik, Google Pay आणि Paytm यांसारखे प्रोव्हाइडर्स लिस्टेड आहेत.
  • एकदा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर प्रोव्हाइडर्सच्या कन्फर्मेशन पेजवर Back to Google बटण दिलेले असते, याद्वारे युजर्स पुन्हा सर्चवर येतात. कन्फर्मेशन पेजवर युजर्सना रिचार्जबाबत कस्टमर सपोर्ट इंन्फॉर्मेशनचा अ‍ॅक्सेसही दिला जातो.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: