अखेर दिल्लीच्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींच्यो फाशीच वॉरंट जारी करण्यात आले आहे. दोषींना 3 मार्चला फासावर लटकवलं जाणार आहे. या प्रकरणातील आरोपी चारही नराधमांना 3 मार्चला सकाळी 6 वाजता फाशी दिली जाणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने फाशी संदर्भातले नवे डेथ वॉरट जारी केले आहे. मुकेश कुमार सिंह (32), पवन गुप्ता (25), विनय कुमार शर्मा (26) आणि अक्षय कुमार (31) या दोषींची अखेर फाशी देण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निर्भयाच्या पालकांसह संपुर्ण देशवासीय या नराधमांना फाशी कधी होईल त्याची प्रतिक्षा करत होते.
2012 Delhi gang-rape case: The four convicts to be executed on 3rd March at 6 am. pic.twitter.com/neXMXtiHaK
— ANI (@ANI) February 17, 2020
निर्भयाच्या आई- वडिलांची याचिका
या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेच वॉरंट लवकरात लवकर काढण्यात याव यासाठी निर्भयाच्या आई वडिलांनी 11 फेब्रुवारीला कोर्टात याचिका दाखल केली होती. याआधी दोनदा दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने फाशीचे वॉरंट जारी केले होते. या आधी 22 जानेवारीला आरोपींना फाशी देण्यात येणार होती, त्यासाठीचे वॉरंट देखील जारी करण्यात आले होते. मात्र आरोपी विनय शर्माने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. निर्भयाच्या दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती. मात्र फाशीच हे दुसर डेथ वॉरंट देखील पुढे ढकलण्यात आले आहे.
आरोपी विनम शर्माची मानसिक स्थिती ही ठीक नसल्याचे कारण देत सुप्रिम कोर्टात याचिका केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळून लावत विनय शर्मा हा मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं तसंच तो शारीरिकदृष्ट्याही सुदृढ आहे असंही कोर्टाने म्हटलं. न्यायासाठी गेल्या सात वर्षांपासून न्यायालयाचे खेटे घालत असून, आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करताना मागच्या आठवड्यात निर्भयाच्या आईला कोर्टात अश्रु अनावर झाले होते. त्यानंतर आता अखेर नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले असून, आरोपींना 3 मार्चला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे.